हिंगणगाव बु. येथील तलावाच्या सांडवा क्षेत्रात विजेच्या तारा जमिनीला टेकल्या.
वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोठी हानी होण्याची शक्यता.
कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक तलावाच्या सांडवा क्षेत्रात वीज वाहक विद्युत पोल जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.या विद्युत पोलवर असलेल्या तारा जमिनीच्या दिशेला समांतर झाल्या आहेत.संबंधित कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तातडीने हा पोल योग्यरित्या उभा करावा अशी मागणी हिंगणगाव बुद्रुक व उपाळे वांगी येथील शेतकरी,ग्रामस्थांतून होत आहे.या सांडवा क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांच्या गुरांचा संचार असतो.त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या विद्युत पोलमुळे इतर पोलही वाकले आहेत.पावसाळा जवळ आला आहे.सध्या तलावात भरपूर पाणी आहे.पावसाळ्यात तलावाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते.पाण्याला अतिशय वेग असतो.या पाण्यात हा पोल वाहून जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
.