*रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
गेल्या वर्षभरापासुन संपुर्ण जग कोविड१९ च्या महामारीने मोठ्या विवंचनेत असल्याने अनेक मानवी दैंनदिन गोष्टींवर निर्बंध आले आहेत.याचा फटका रक्तदान शिबिरांनीही बसला आहे.लोकांना एकत्र येण्यावरचे निर्बंध व कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे तर दुसऱ्या बाजुला अनेक रुग्णांना वेगवेगळ्या आजारामध्ये लागणाऱ्या रक्ताची मागणी वाढताना दिसत अाहे.त्यामुळे विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.दुसऱ्या बाजुला १ मे पासुन १८ वर्षे वयापुढील तरुणांना पण कोविडप्रतिबंधक लसीकरण सुरु केले जाणार आहे.तज्ञांच्या म्हणण्यानुसार लसीकरणानंतर किमान ३० दिवस रक्तदान करु नये असे सांगण्यात येत आहे.याचाही परिणाम म्हणुन मे/जुन मध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त टंचाई होऊ शकते.या सर्व गोष्टींचा विचार करुन रोटरी क्लब आॅफ विटा सिटीने शनिवार दिनांक १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.विटा यंत्रमाग संघ,मायणी रोड विटा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजीत केलेल्या या शिबिरामध्ये सहभागी होऊन हा सामाजीक उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन विटा रोटरी परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अध्यक्ष,रोटरी क्लब आॅफ विटा सिटी
सुधिर बाबर व सर्व रोटरी परिवार