*संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न*
भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावी देवराष्ट्र गावात आज 'मुलूखमाती' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे कृषी-सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजितदादा कदम यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास आमदार विक्रम सावंत,शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख,ख्यातनाम समीक्षक डॉ रणधीर शिंदे,प्रांताधिकारी आयुषी सिंह (आय ए एस), सुप्रसिद्ध कवी आणि प्रांताधिकारी गणेश मरकड,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक महेंद्र लाड,युवक नेते डॉ जितेश भैय्या कदम,लोकायत प्रकाशनाचे राकेश दादा साळुंखे आणि माझी आई आदी मान्यवर उपस्थित होते.
कडेगाव तालुका पत्रकार संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मित्रवर्य प्रताप नाना महाडीक आणि स्वप्नील पवार यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
माझे बालपण ज्या परिसरात गेले त्या देवराष्ट्र परिसरात हा कार्यक्रम झाल्याचा एक वेगळा आनंद आहे.मुलूखमाती तील अनेक शब्दचित्र याच परिसरातील आहेत. असे संपतराव मोरे यावेळी बोलताना म्हणाले