*भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर*
भाळवणी येथे 2 कोटी 35 लाखाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन
भाळवणी गाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून उदयास येत असताना गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी दिली ते भाळवणी येथे विविध विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते यावेळी पंचायत समिती सभापती महावीर शिंदे,जिल्हा परिषद सदस्या सुलभा ताई अदाटे,जेष्ठ मार्गदर्शक नामदेव चव्हाण गुरुजी,महेश घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य राजू शिंदे,विठ्ठल घोरपडे, सलीम संदे नबीलाल पेंटर,ऍड मुसा मुजावर, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बाबर म्हणाले की,भाळवणी गाव हे राजकीय दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे,परंतु विकासाच्या बाबतीत या गावातील लोक नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात
या गावाने नेहमीच माझ्या राजकीय जडणघडणीत माझ्याबरोबर राहून माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यांच्या बरोबर राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व मी सुद्धा गावच्या विकासासाठी कधीही अंतर दिले नाही. व या गावाने दाखवलेल्या विश्वासास पात्र होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.त्याच बरोबर या गावातील व वाडीवस्तीवरील रस्ते व बोळ रस्ते करण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद केली आहे,अशा प्रकारे या गावात विकासासाठी भरघोस निधी देऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.गावाला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते दर्जेदार बनवून गावातील दळणवळण च्या सुविधा सुखकर करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचाच एक भाग म्हणून विट्याला जाणाऱ्या रस्त्याची दरजोन्नती करून तो प्र जी मा केला व त्याची रुंदी वाढवली भविष्यात गावातील अंतर्गत सर्व रस्ते,स्ट्रीट लाईट लवकरच पूर्ण केल्या जातील त्याचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे मध्यंतरी कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे विकास कामांना निधीची कमतरता होती परंतु आता हळूहळू कोरोना चे पेशंट कमी होऊ लागले आहेत व सरकारच्या तिजोरीत पैसे येऊ लागले आहेत त्यामुळे भविष्यात विकास कामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही
यावेळी शशिकांत अदाटे,अस्लम मोमीन, जाफर मोमीन, नजरूद्दिन मुजावर, ईलाईभई मुजावर, सादिक मुजावर, सुबराव धनवडे, हिंदुराव धनवडे, वसंत धनवडे, आशिफ मोमीन, लतिफ भाडलेकर, जालिंदर सुयॅवंशी, पोपटराव शिंदे, पोपट राठवडे, अशिफ भाडलेकर, अशोक मोहिते, अंकुश चव्हाण, मुसा शिकलगार, सचिन चव्हाण, अन्सार मुल्ला, महंमद मुजावर, हणमंत अदाटे, हणमंत शिरतोडे, राजू सुयॅवंशी, सतीश पवार, प्रकाश बोबडे, प्रमोद मगर, संजय धनवडे, हेमंत पाटील, विकास धनवडे, कमलेश मगर, आणि भाळवणी गावातील व मुजावर वस्ती येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते