शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
👉शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत दाखल झालं आहे. आज आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी होणार आहेत. तसेच आज आंदोलक राज्यपालांची भेट घेऊन कृषी कायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत.
👉मुंबईत धडक दिलेल्या किसान मोर्चाची आज भव्य सभा होणार आहे. आझाद मैदानात होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात ठिय्या दिला आहे. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकरी 'चलो राजभवन' म्हणत राजभवनाकडे कूच करणार आहेत. किसान मोर्चाचे प्रतिनिधी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कृषिकायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात हा मोर्चा आहे.